नाशिक (प्रतिनिधी): तांत्रिक कामासाठी शहरात दि. १० मे रोजी संपूर्ण दिवसभर तर रविवार दि. ११ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामधील विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभयेथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ येथे करावयाच्या विविध कामांच्या अनुषंगाने तसेच बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी स्मार्ट सिटी यांनी शटडाऊनचे नियोजन केले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

