नाशिक। दि. ३ जानेवारी २०२६: नाशिक महानगरपालिका हद्दीतील सातपूर विभागात १२०० मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली आहे. मुक्त विद्यापीठ गेट परिसरातही गळती सुरू झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी (दि.४) शहरातील मुख्य पाचही विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
१२०० मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनद्वारे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड तसेच नवीन नाशिकमधील काही भागांना पाणीपुरवठा होतो. गळती मोठ्या स्वरूपाची असल्याने दुरुस्तीचे काम रविवारी (दि. ४) सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असून, हे काम ८ ते १० तास चालणार आहे.
या कामामुळे रविवार दुपारचा पाणीपुरवठा नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिक रोड व नवीन नाशिकमधील पवननगर जलकुंभावरून वितरण होणाऱ्या भागात बंद राहणार आहे. तसेच सोमवार (दि. ५) रोजी पाणीपुरवठा कम १ दाबाने होण्याची शक्यता आहे. ही अत्यावश्यक व तातडीची दुरुस्ती नागरिकांच्या हितासाठी करण्यात येत असून, नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. रविवारी शहरात पाणीपुरवठा होणार नाही तर सोमवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.
![]()


