नाशिक (प्रतिनिधी): मार्च महिन्यातच नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त 50 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येत्या काळात कोरोना सोबतच नाशिककरांना पाणीटंचाईला सामोरे जावे असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यातील इतर भागात चांगला पाऊस झाला असला तरी नाशिक पट्ट्यात मात्र कमी पाऊस झाल्याने यंदा मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यतील धरणसाठा 52 टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीकपातीचा निर्णय घ्यावे लागणार असल्याचे संकेत नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणात फक्त पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घ्यावे लागणार असल्याचे संकेत आयुक्त यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात वाढत कोरोनाच्या संकटा सोबतच नाशिककरांना पाणी कपातीचा संकटाला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे….!