नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल खंडणी, विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी अवैध सावकार वैभव देवरे याचा पोलिसांनी कारागृहातून ताबा घेतला. न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. सोमवारी पथकाने त्याचा ताबा घेतला. देवरेच्या विरोधात चार गुन्हे दाखल असून या गुन्ह्याच्या तपासाकरीता त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याचा पुन्हा ताबा घेतला जाईल, अशी माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव देवरे यास खानकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार खंडणीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पथकाने तपास करत देवरेने ग्राहकांच्या आणलेल्या ८ कार, ३ फ्लॅटचे कागदपत्र, आणि पत्नीसह नातेवाइकांच्या घरी झडती घेत कोट्यवधींची मालमत्ता असलेली कागदपत्रे जप्त केली आहेत. सटाणा येथील आलिशान फार्म हाउसची झडती घेण्यात आली आहे.
आयकर विभागाकडून कागदपत्र ताब्यात:
वैभव देवरे याचे सटाणा येथील फार्म हाउस व कोट्यवधीची स्थावर-जंगम मालमत्तेसंदर्भात आयकर विभागाने कागदपत्रे पोलिसांकडून ताब्यात घेतले.