रेमडेसिवीर २५ हजाराला विक्री करणाऱ्या डॉक्टरला नाशिकमध्ये अटक

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिवीरचा काळाबाजार करत १२०० रुपयांना मिळणारे हे रेमडेसिवीर तब्बल २५ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अमृतधाम परिसरातून अटक केली. रविवारी (दि.११) सायंकाळी अमृतधाम परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. रवींद्र मुळूक असे या संशयित डॉक्टरचे नाव आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने यासाठी रुग्णांचे नातेवाईक आंदो लन करत असतानाच काळ्या बाजारात मात्र हे रेमडेसिवीर उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि योगेश मोहिते (रा. अशोका मार्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रुग्णाला रेमडेसिवीर तातडीने देण्यासाठी पंचवटीतील सद्गुरू हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र मुळीक यांच्याशी संपर्क साधला होता. हे इंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचा व्यवहार ठरला. मुळीक यांनी मोहिते यांना अमृतधाम येथे बोलावले. रेमडेसिवीर विक्री करतानाच पोलिसांनी डॉ. मुळीक यांना अटक केली.

मोहिते हे डॉ. मुळीक यांच्याकडून २५ हजार रुपयांना हे रेमडेसिवीर खरेदी करणार होते. मात्र, पाच हजार रुपयांची रक्कम कमी पडत असल्याने ते अमृतधामजवळील एका एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढण्यास गेले. तेथे त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री १०० नंबरवर संपर्क साधून याबाबत तक्रार दिली. ही तक्रार पंचवटी पोलिस ठाण्याला प्राप्त होताच काही वेळात वेळात पथक घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला अटक करण्यात आली. संशयित डॉ. मुळीक यांनी यापूर्वी किती रेमडेसिवीर विक्री केले याचाही तपास पोलिस करणार आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

हे इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांना रेमडेसिवीर पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना डॉक्टरकडूनच हे चढ्या भावाने विक्री होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790