नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२५: श्री गणेशोत्सवानिमीत्त शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य-दिव्य, हलते-चालते देखावे सादर केले आहे. वीकेंडमुळे देखावे बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाकडून शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ ते ५ सप्टेंबर २०२५पर्यंत सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश बंद मार्ग:
👉 नाशिक शहरातील मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल कडून कालीदास कला मंदीर मार्गे सुंमगल कपडयाचे दुकान शालीमार चौकाकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजुने सर्व वाहनांसाठी जाण्या-येण्यास ‘प्रवेश बंद’ राहील.
👉 सीबीएस बाजु कडुन गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपडयाचे दुकानाकडे व सुमंगल कापड दुकानाकडुन कालीदासमार्ग व किटकॅटकडुन सिबीएस बाजुकडे ये-जा करणारी वाहतुकीस दोन्ही बाजुने सर्व वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ राहील.
👉 पंचवटी विभागातील सरदार चौक ते श्री. काळाराम मंदीर पावेतोचा रस्ता दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी ‘प्रवेश बंद’ राहील.
👉 पंचवटी विभागातील मालविय चौक ते गजानन चौक, व गजानन चौक ते नागचौक, नाग चौक ते शिवाजी चौक, व शिवाजी चौक ते मालविय चौक हे मार्ग दोन्ही बाजूने सर्व वाहनांसाठी जाण्या-येण्यास ‘प्रवेश बंद’ राहील.
👉 दिंडोरी नाका कडुन मालेगांव स्टॅण्ड कडे ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहतुकीस ‘प्रवेश बंद’ राहिल.
मखमलाबाद नाका ते मालेगांव स्टॅण्ड ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहतुकीस ‘प्रवेश बंद’ राहिल.
पर्यायी मार्ग:
👉 मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालीदास कलामंदीरमार्गे सुमंगल कपडयाचे दुकानाकडे ये जा करणारी वाहने सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नल या मार्गाचा वापर करतील.
👉 दिंडोरी नाक्याकडुन मालेगांव स्टॅण्ड कडे जाणारी वाहतुक ही पेठ नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी- चोपडा लॉन्स मार्गे इतरत्र जातील.
👉 मखमलाबाद नाक्याकडुन मालेगांव स्टॅण्ड कडे जाणारी वाहतुक ही पेठ नाका मार्गे इतरत्र जातील.
👉 तसेच, वाहनचालक हे गर्दीचे ठिकाणे सोडुन इतर तत्सम पर्यायी मार्गाचा वापर करतील.
वरिल निर्बंध हे दि.३१ ऑगस्ट २०२५ ते दि. ०५ सप्टेंबर २०२५ पावेतो दररोज सांयकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत किंवा गणपती आरास बंद होई पर्यंत अमंलात राहतील.