नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावर असलेला जुना आणि नवीन आडगाव उड्डाणपूल जोडण्याचे काम सुरू करण्यात आल्याने त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करून ती समांतर रस्त्याने वळविण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वात लांबीच्या उड्डाणपुलाला के. के. वाघ महाविद्यालयाजवळ नवीन उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सदर कामासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. आगामी ४५ दिवसात नवीन उड्डाणपूल जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून सदरच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जुन्या उड्डाण पुलावरून धुळे बाजूने येणारी वाहने द्वारका येथून खाली उतरविण्यात येणार आहेत. तर द्वारका येथून वाहने कन्नमवार पूल, ट्रॅक्टर हाऊस, तपोवन चौफुली, संतोष टी पॉट, स्वामी नारायण चौकातून, अमृतधाम चौफुली मार्गे धुळ्याकडे’ जातील, तसेच रॅम्पररून पुलावर जाण्यास मनाई केली आहे. धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना सर्विस रस्त्याने क. का. वाघ ते अपोलो हॉस्पिटलपर्यंत उजव्या हाताने वळण घेऊन पुढे स्वामीनारायण चौक संतोष टी पॉईंट, तपोवन क्रॉसिंग ट्रॅक्टर हाऊस पुढे द्वारका उड्डाणपूल प्रवास करावा लागणार आहे.
वाहतूक बदलासाठी १६ पॉइंट तयार करण्यात आले असून, त्यासाठी दोन अधिकारी डझनभर वाहतूक ‘पोलीस आणि ६० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येणार आहे.