नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसतात. सिग्नल लागल्यावर तो सुटेपर्यंत रखरखत्या उन्हात वाहनचालकांना उभे रहावे लागते. त्यामुळे आता दुपारी २ ते ४ या वेळेत शहरातील सर्व सिग्नल्ससह महामार्गावरीलही सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
कडक उन्हापासून काहीकाळ नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने दुपारच्या वेळेत शहरातील विविध भागांतील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटीला पुढील कार्यवाही करण्यास पोलिस आयुक्तालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे. वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने द्वारका, सीबीएस यांसारखे जास्त रहदारी असलेले सिग्नल मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. कमी वर्दळीच्या ठिकाणांवरील सिग्नलवर वाहनधारकांना सूट मिळणार आहे.