नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रंगपंचमीनिमित्त पंचवटी आणि भद्रकाली परिसरात रहाडीच्या ठिकाणी नागरीकांनी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये करीता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
पंचवटी: काळाराम मंदिर, खांदवे सभागृह, मालवीय चौक, सरदार चौककडून शनी चौकात येणारे रस्ते वाहतुकीकरिता बंद राहणार आहेत. या मार्गावरील वाहतूक सरदार चौक, रामकुंड, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड, ढिकले वाचनालयमार्गे इतरत्र वळविण्यात आली आहे.
भद्रकाली: या परिसरातील नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, बादशाही कॉर्नर ते बुधा हलवाई, मधली होळी, नेहरू चौक ते बुधा हलवाई, दूधबाजार ते जुनी तांबट लेन, हाजी टी पॉईंट ते चौक मंडई, काझीपुरा पोलिस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काझीपुरा पोलिस चौकी, मिरजकर गल्ली ते काझीपुरा पोलिस चौकी मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. यामार्गावरील वाहने पर्यायी मार्ग नेपाळी कॉर्नर खडकाळी सिग्नल, दूधबाजार चौकाकडून बादशाही कॉर्नर, दूधबाजारकडे, दुध बाजार चौक ते उमराव मेडिकलकडे, वाकडी बारव, चौक मंडईकडे, हाजी टी पॉइंटकडून चौक मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे मिरजकर गल्लीकडून उमराव मेडिकल रोडने इतरत्र जाईल.