नाशिक: शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात महत्वाचे बदल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सोमवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातून मुख्य मिरवणूक निघते, तर उपनगर परिसरातही मिरवणुका निघतात. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.

त्यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी करीत, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

मुख्य मिरवणूक (वाकडी बारव):
बंद मार्ग : वाकडी बारव-महात्मा फुले मंडई-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा-मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामतीर्थांपर्यंत.
पर्यायी मार्ग : निमाणी व पंचवटी कारंजापासूनच्या सिटी लिंक बस पंचवटी डेपोतून सुटतील. रविवार कारंजा व अशोतस्तंभ मार्गे जाणाऱ्या सिटीलिंक बस शालीमारवरून सुटतील. तसेच, सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका मार्गे नाशिकरोड व शहरात इतरत्र जातील.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

नाशिक रोड परिसर: छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड आणि जेलरोड या दोन ठिकाणी शिवजयंती उत्सव. १९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक, २० ते २२ फेब्रुवारी सायंकाळी ७ ते साडेदहा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

बंद मार्ग: बिटको चौक व सिन्नरफाटासह रेल्वेस्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक, बिटको चौकातून जेल रोड मार्गे व नांदूर नाक्याकडून बिटको चौकाकडे दोन्ही बाजूची वाहतूक
पर्यायी मार्ग : रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगर टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट, रिपोर्टे कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशन. सुभाष रोडमार्गे परतीची वाहतूक, नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या सिटीलिंक बस नाशिकरोड जुने न्यायालयासमोरून आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उपनगर सिग्नलमार्गे जातील, पुणे-नाशिक सर्व प्रकारची वाहतूक दत्त मंदिर चौकातून उड्डाणपुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील व येतील, बिटको चौकातून जेल रोड मार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगर येथून कॅनल रोड ते हरीविहार समोरील रस्त्यावरून नारायणबापू नगरमार्गे टाकळीकडे जातील, नांदूर नाक्याकडून बिटको चौकात येणारी वाहतूक दसक पुलावरून एकेरी मार्गावर सुरू असेल

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

अंबड परिसर:
बंद मार्ग: बोधले नगर सिग्नल, कलानगर, पाथर्डी फाटा, पाथर्डी सिग्नल ते गरवारे दोन्ही बाजूंनी अवजड वाहतूक बंद, पाथर्डी गाव ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद
पर्यायी मार्ग: गरवारे पॉइंट येथील उड्डाणपुलावरून द्वारकाकडे. बोधलेनगर सिग्नलवरून द्वारकापर्यंत व तेथून उड्डाण पुलावरून गरवारे पॉइंटकडे, पाथर्डी गाव, सिग्नलमार्गे सातपूरकडे जाणारी वाहतूक पांडव लेणीसमोरील बोगद्यातून अंबड एमआयडीसी मार्गे वाहने जातील.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

पंचवटी परिसर:
बंद मार्ग : मालेगाव स्टॅन्ड – इंद्रकुंड – पंचवटी कारंजा – दिंडोरी नाका, मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे दोन्ही मार्ग
पर्यायी मार्ग: दिंडोरी नाका-पेठ नाका-मखमलाबाद नाका-रामवाडी, पूलमार्गे इतरत्र, मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पूलमार्गे इतरत्र, ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे इतरत्र.

”शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक मार्गस्थ होतील. त्यामुळे वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.”- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790