नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
द्वारका शालिमार येथे वाहनांना मज्जाव; जाणून घ्या पर्यायी मार्ग…
नाशिक (प्रतिनिधी): काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे गुरुवारी (दि.१४) नाशिक दौऱ्यावर येत आहे. दुपारी १ वाजता द्वारका सर्कलपासून त्यांचा ‘रोड-शो’ होणार आहे. यामुळे गुरुवारी मेहेर सिग्नल ते थेट गडकरी चौकापर्यंत दुपारी दुहेरी वाहतूक बंद राहणार आहे तसेच द्वारका सर्कल ते शालिमार या रस्त्यावरही पूर्णपणे वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेकडून बुधवारी (दि.१३) याबाबत सुधारित अधिसूचना जारी केली. रोड- शो संपेपर्यंत अधिसूचना अंमलात राहणार असल्याचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी स्पष्ट केले आहे.
या मार्गावर प्रवेश बंद:
टिळकवाडी सिग्नल ते सीबीएस, द्वारका ते सारडा सर्कल, फाळके रोड ते दूध बाजार, त्र्यंबक नाका पोलिस चौकी ते खडकाळी सिग्नल, शालिमार चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका, शिंगाडा तलाव ते सारडा सर्कल.
पर्यायी मार्ग असा:
अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक गंगापूर रोडने पोलिस आयुक्तालयासमोरून पुढे जाईल. मुंबई नाक्याकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक ही गडकरी सिग्नलवरून चांडक सर्कलमार्गे मायको सर्कलकडे जाईल. काठे गल्ली सिग्नलकडून द्वारकेकडे येणारी वाहतूक डावीकडे वळण घेत भाभानगर रस्त्याने पुढे मुंबई नाक्याकडे जाईल. गडकरी चौकातून सारडा सर्कलकडे जाणारी वाहतूक सरळ मुंबई नाकामार्गे पुढे जाईल.
या ठिकाणी बॅरिकेडिंग:
द्वारका सर्कल (दोन्ही बाजूंनी रॅम्प, संलग्न रस्ते), ट्रॅक्टर हाऊस (मुंबई-आग्रा महामार्ग), काठे गल्ली सिग्नल (पुणे महामार्ग), वडाळानाका (द्वारका-सारडा सर्कल रोड), खडकाळी सिग्नल (गंजमाळ रोड), शालिमार चौक, मेहेर सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबकनाका सिग्नल, गडकरी चौक सिग्नल.