नाशिक। दि. ११ जानेवारी २०२६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (दि. ११) गोदाकाठी जुन्या भाजी पटांगणात सभा होणार आहे. त्यामुळे भागातील या रस्त्यांवरील वाहतूक सकाळी ६ वाजेपासून सभा संपेपर्यंत बदलण्यात आली आहे. नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्क करावी तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी केले आहे
👉 सकाळी ६ वाजेपासून हे रस्ते बंद:
ढिकले वाचनालय, मालेगाव स्टँड, म्हसोबा पटांगण आणि खांदवे सभागृह या बाजूने रामकुंडाकडे जाणारे सर्व मार्ग. सरदार चौक ते काळाराम मंदिर आणि शनी चौक ते सरदार चौक हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल.
👉 येथे असेल पार्किंग:
रामकुंडावर पूजाविधीसाठी येणारे भाविक आणि काळाराम मंदिराचे दर्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी गौरी पटांगण किंवा म्हसोबा पटांगण येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून पुढे नागरिकांना पायी जावे लागणार आहे.
👉 असे असतील पर्यायी मार्ग:
रामकुंडाकडे जाणारी वाहने पंचवटी कारंजा, दिंडोरीनाका, गणेशवाडी ते गौरी पटांगणावरुन जातील. सरदार चौकाकडील वाहतूक गणेशवाडीमार्गे जाईल. शनी चौकाकडून जाणारी वाहने काट्या मारुती आणि गौरी पटांगण मार्गावरुन जातील.
![]()


