नाशिकमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक। दि. ७ मार्च २०२६: शहरातील गंगापूर रोड परिसरात एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांच्या पत्नी डॉ. मनीषा जेजूरकर (वय ४०) यांनी राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

ही घटना शुक्रवारी (दि. ६) सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. डॉ. जेजूरकर या घरातील खिडकीजवळील लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणे यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: १८/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790