नाशिक: पारा घसरला, गारठा वाढला; किमान तामपान 17 अंशांवर !

नाशिक (प्रतिनिधी): अवकाळी पावसाने झोडपल्‍यानंतर आता हिवाळ्याची चाहुल लागली आहे. दिवसा कडक उन पडत असले तरी, सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. गेल्‍या पाच दिवसांत पाऱ्यामध्ये पाच अंश सेल्सिअसची घसरण झालेली आहे. रविवारी (ता.२७) नाशिकचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्‍यानंतर तितक्‍याच कडाक्‍याचा हिवाळा असेल, असा अंदाज वर्तविला जातो आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

त्‍यात आत्तापासून थंडीची लाट अनुभवायला येऊ लागली आहे. सायंकाळी सहानंतर वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने पाऱ्यामध्ये सातत्‍याने घसरण होते आहे. गेल्‍या बुधवारी (ता. २३) नाशिकचे किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदविले होते. त्‍यामध्ये जवळपास पाच अंश सेल्सिअसची घसरण होऊन रविवारी (ता. २७) किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. येत्‍या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

कमाल तापमान ३३ अंशांपर्यंत:

किमान तापमानात घसरण होत असली तरी कमाल तापमान सातत्‍याने चढते आहे. दिवसाच्‍या वेळी प्रखर सुर्यकिरणांमुळे तप्त उन्‍हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. सुर्यास्‍तानंतर वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात होत आहे. आज म्हणजेच

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790