नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबतच्या व्हिडिओत नाचताना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर दिसत असल्याच्या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून होत आहे.
शुक्रवारी (दि. २२) गुन्हे शाखा युनिट १ च्या कार्यालयात बडगुजर यांची चौकशी करण्यात आली. यात त्यांनी काही प्रश्नांची तोंडी उत्तरे दिली, मात्र आपल्या कायदेशीर सल्लागारासह काही प्रश्नांची लेखी उत्तरे देण्यात आली असून यापुढेही कायदेशीर सल्लागार सोबत असतानाच उत्तरे ते देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बडगुजर यांनी प्रश्नांवर उत्तर देण्याकरिता मुदत मिळावी अशी विनंती केली होती. गुन्हे शाखेकडून विनंती मान्य करत ही चौकशीत ठोस माहिती निष्पन्न होत नाही तोपर्यंत चौकशी सुरूच राहणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बडगुजर यांना परत परत सलीम कुत्ता कसा संपर्कात आला. पार्टी कोणाकरिता होती आदी प्रश्नांचा भडिमार केल्याने बडगुजर यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली, मात्र काही उत्तर देण्याकरिता कायदेशीर मदत घेत लेखी स्वरूपात उत्तरे दिल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली. ५ दिवसांत गुन्हे शाखेकडून १९ साक्षीदारांची चौकशी केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.
चौकशीत महत्त्वाची माहिती:
बडगुजर यांच्यासह पार्टीमधील १९ साक्षीदारांच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच सांगणे उचित राहील. बडगुजरांनी कायदेशीर सल्लागाराच्या मदतीने तोंडी व लेखी स्वरूपात उत्तरे दिली आहेत. चौकशीत नवीन खुलासे होत अल्याने साक्षीदरांसह बडगुजर यांची चौकशी सुरूच राहणार आहे. – विजय ढमाळ, वरिष्ठ निरीक्षक गुन्हे शाखा
![]()


