शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळा-संस्थांना पत्राद्वारे इशारा
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म न भरल्यास हॉल तिकीट अडवल्यास शाळांवर कठोर कारवाई करणार असल्याचा गंभीर इशारा शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा सुरु झाल्या असून, लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा सुरू होण्यासह १ मार्चपासून लेखीलाही प्रारंभ होणार आहे. तरी देखील काही शाळांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरलेले नाहीत. काहींना परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीटही) दिले नाही.
विशेषतः जिल्ह्यातील काही स्वयं अर्थसहाय्यीत शाळा (सीबीएसई, आयसीएसइ, स्टेट बोर्ड) खासगी विना अनुदानित शाळांकडून शुल्क भरले नसलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेचे फॉर्म भरू दिले जात नाहीत. विद्यार्थी अभ्यासात गुंतलेले असून काही शाळांकडून थकीत विविध शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याची शिक्षणाधिकाऱ्यांनीच गंभीर दखल घेतली आहे.
शैक्षणिक संस्थांवर कारवाई:
ज्या संस्थांकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्मन भरणे, हॉल तिकीट अडवणेया बाबीकेल्या जात असतील तर अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई होईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शाळेला जबाबदार धरले जाईल. – प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी
कायमचा तोडगा निघावा:
विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास शैक्षणिक संस्था जबाबदार राहतील. दरवर्षी या गोष्टी होत असल्याने कायमस्वरूपी तोडगा निघावा. नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंट असोसिएशन