नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कै भीष्मराज बाम स्मृती जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पार्थ देवरे आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत पूर्ण स्पर्धा गाजवली.
पुरुष एकेरीत त्याने प्रतिस्पर्धी क्रुष्णा मजेठिया याचा २१-१५, २१-२२ असा पराभव केला तर दुहेरीत पार्थ लोहकरे याच्या साथीने अनुभवी अशा विनायक दंडवते आणि अमेय खोंड यांचा २१ – १६ , २१ – १६ असा सहज पराभव केला. महिलांच्या एकेरीच्या सामन्यात वरदा एकांडे हिने श्रावणी पाटील हिचा संघर्षपूर्ण अशा सामन्यात १९-२१ ,२१-१९, २१-१५ असा पराभव केला.
दीर्घ रॅलिज आणि जोरकस स्मॅश चा वापर वरदाने विजय मिळवला. ११ वर्षां खालील मुलांच्या एकेरीच्या सामना सुद्धा उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला यात अनुज पाटील याने विरेश गायकवाडचा १७-२१ , २१-१२ , २१-१५ असा पराभव केला.
बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून निवेकचे अध्यक्ष जनक सारडा तसेच स्वप्नील भामरे, आशिष वत्तेमवार , संदीप भदाणे , जिल्हा संघटनेचे सचिव पराग एकांडे उपस्थित होते, यावेळी जनक सारडा यांनी बाम सरांच्या ध्यास उत्तमाचा या मंत्राचा सर्व खेळाडूंनी अवलंब करावा असे आवाहन केले. सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन साई स्पोर्ट्स चे अनंत जोशी यांनी केले.
स्पर्धेचे इतर निकाल पुढील प्रमाणे:
१७ वर्षां खालील मुली एकेरी
दर्शिता राजगुरू वि वि श्रावणी पाटील २३-२१ , २१-१४
१९ वर्षां खालील मुली एकेरी:
नंदिनी भार्गव वि वि श्रावणी पाटील १६-२१ , २१-१६, २१-९
१३ वर्षां खालील मुली एकेरी:
जागृती जाधव वि वि जुई राजगुरू २१ -१८, २१- १३
महिला दुहेरी:
क्रुष्णा काकडे , सिया वायदंडे वि वि हिता अग्रवाल ३०-२७
१७ वर्षां खालील मुले एकेरी:
स्वराज भामरे वि वि विश्वजित थवील २१-१८, ७-२१, २३-२१
१९ वर्षां खालील मुले एकेरी:
पार्थ लोहकरे वि वि स्वराज भामरे २१-१६, २१-१९
१३ वर्षां खालील मुले एकेरी:
यश अग्रवाल वि वि योहान कल्याणी २१ -१८, २१- ११, २१-७
१५ वर्षां खालील मुले एकेरी:
विश्वजित थवील वि वि कबीर पाटील २१-५, २१-१२
१९ वर्षां खालील मुले दुहेरी:
मानस ठाकरे , सिद्धेश दुर्गपुरोहित वि वि सोहम हिंगणे , स्वराज भामरे २१- १६ , २१ – १८
११ वर्षां खालील मुली एकेरी:
कैरवी कुलकर्णी वि वि आयुषका पाटील २१- ९ , २१- १३
१५ वर्षां खालील मुली एकेरी:
संतोषी खैरनार वि वि जागृती जाधव २१-११ , २१ – १४
१५ वर्षां खालील मुले दुहेरी:
आयुष बागुल , देव मानकर वि वि अखिलेशकुमार कुर्हाडे , श्रेयस मन्नूर २१-१५, २२-२०