नाशिक: खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरणी कर्मचारी निलंबित

नाशिक (प्रतिनिधी): भगूर नगरपरिषदेकडून वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्सजवळ पाइपलाइनच्या कामासाठी खड्डे खोदले होते. काम झाल्यावरही खड्डे तसेच होते. त्यात अमित रामदास गाढवे हे दुचाकीसह खड्ड्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भगूरच्या ग्रामस्थांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामात कुचराई करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी रवींद्र संसारे याला निलंबित केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790