नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत साकारण्यात आलेल्या संतशिरोमणी सावता महाराज क्रीडांगणाला २ वर्षांचा कालावधी उलटत नाही, तोच त्याला अवकळा आलेली आहे. टवाळखोरांकडून बाथरूम व सभागृहाचे नुकसान झाले आहे, तर दरवाजे, खिडक्या आणि लोखंडी गेट चोरीला गेले आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने क्रीडांगणाचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. देखभाल – दुरुस्तीअभावी मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
