नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि.१७ जून) रात्री अजून २२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, या आधी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ३१ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे बुधवारची कोरोनाबाधीतांची एकूण संख्या ५३ झाली आहे.
बुधवारी रात्री ९.२५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: विष्णू नगर-१, पेठ रोड-२, फुले नगर-२, दिपाली नगर-१, काझीपुरा-२, खोडे नगर-१, पखाल रोड-१, महालक्ष्मी चौक (सातपूर)-३, आझाद चौक-२, पंचवटी-१, कोणार्क नगर-२, नवनाथ नगर-१, गणेशवाडी-१, वडाळा रोड-१, गंजमाळ-१ अशा एकूण २२ रुग्णांचा समावेश आहे.
तर याआधी बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: वडाळा नाका-१, कोकणीपुरा-१, कामठवाडे-३, थत्ते नगर-१, बोरगड-१, गंजमाळ-१, फुले मार्केट-२, जीपीओ रोड-१, शालीमार-१, रेडक्रॉस-१, विसेमळा-१, उपनगर-१, दुध बाजार-१, मखमलाबाद-१, पेठ रोड-२, नाशिकरोड-१, उपनगर-२, कथडा-१, शिवाजी चौक (सिडको)-१, कोकणीपुरा-२, पेठरोड-१, काठे गल्ली-१, वडाळा रोड-२, अयोध्या कॉलनी-१ अशा एकूण ३१ रुग्णांचा समावेश आहे.