नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) ५८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १६८७, एकूण कोरोना रुग्ण:- ५५,०७७, एकूण मृत्यू:-७८३ (आजचे मृत्यू ०७), घरी सोडलेले रुग्ण :- ५०,००९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४२८५ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) फ्लॅट क्र १०,आसावरी अपार्टमेंट,कौट घाट,नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) फ्लॅट क्र २, श्री स्वानंद अपार्टमेंट, आनंदवन कॉलनी, येवलेकर मळा, कॉलेज रोड नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) फ्लॅट क्र २,अद्वय सोसायटी, भाभा नगर, मुंबई नाका नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) प्लॉट क्र.३०, जय जनार्दन निवास, उदय नगर,पंचवटी, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) ४-उमा दीप रो हाऊस, कॅनॉल रोड श्रीराम नगर, ठाकरे मळा,जेलरोड येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ६) घर नंबर ९८०, गणेश चौक, कामगार नगर, सातपूर येथील ६४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) सिडको, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.