नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (3 जून 2020) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता नाशिक शहरात एकूण कोरोना रुग्ण:-२५६ एकूण मृत्यू:- १२ घरी सोडलेले रुग्ण :- ९३ उपचार घेत असलेले रुग्ण:- १५१ असे आहेत. लॉकडाऊन मध्ये जरी शिथिलता मिळाली असली तरी नाशिककरांनी काळजी घेण्याची गरज आहे.
बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती:
उत्तम नगर सिडको येथील ५२ वर्षीय व्यक्ती व २२ वर्षीय युवक या पिता पुत्राचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
गिताई बंगलो,हॉटेल मागे नाशिक येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जुन्या रुग्णाच्या संपर्कातील..
कर्मा हाईट्स,प्लॉट क्रमांक ५ तपोवन रोड नाशिक येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा प्राप्त झाला आहे.जुन्या रुग्णाच्या संपर्कातील..
प्रज्ञा सोसायटी,कोणार्क नगर,दत्त मंदिर,आडगाव शिवार येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधित आलेला आहे..
कलानगर येथील प्लॉट क्रमांक ८६ कुबेर बंगलो, नाशिक येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे…
समता नगर टाकळी येथील ५५ वर्षीय व्यक्ती वर दि ३१/०५/२०२० पासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते त्याचे दि.२/०६/२०२० रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल काल दि २/०६/२०२० रोजी सायंकाळी प्राप्त झाला.