नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) ७४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०८३, एकूण कोरोना रुग्ण:-४६,८४३, एकूण मृत्यू:-६७९ (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- ४२,६५०, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३५१४ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) शिवाजीनगर,सातपूर येथील २७ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. २) शिवाजीनगर, सातपूर येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) चेहेडी पंपिंग, हनुमान मंदिर जवळ, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) घर नंबर २४६७/२ पिंजार घाट, हुसेनी चौक, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) पळसे रोड, नाशिक रोड,नाशिक येथील २५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ६) गजानन निवास, दत्त मंदिरा शेजारी, त्रिमुर्ती नगर,हिरावाडी रोड, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) पंचवटी, नाशिक येथील ३० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) नाशिक रोड,नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) रोहाऊस बी-४, सिद्धार्थ गार्डन, राम मंदिरामागे, नाशिक रोड येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १० )नाशिकरोड, नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.