नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) ६१० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १३३९, एकूण कोरोना रुग्ण:-१८,०३०, एकूण मृत्यू:-४१२ (आजचे मृत्यू ०७), घरी सोडलेले रुग्ण :- १५,६६२, उपचार घेत असलेले रुग्ण:- १९५६ अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गणेश नगर, जेल रोड येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) श्रमिक नगर, नाशिक येथील ५० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) नाशिकरोड, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) इंदिरानगर नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ५) त्रंबकरोड, पिंपळगाव बहुला, राजवाडा सातपूर येथील ३२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) जत्रा हॉटेल, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) साई शिव संकुल, श्रीकृष्ण नगर,अंबड परिसर नाशिक येथील ४४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790