नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि.१८ जून) रात्री अजून ३६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरु केले आहे. तरी नागरिकांनी या सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. १८ जून) सायंकाळी ७.३० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: कोकणीपुरा-१, वृंदावन कॉलनी-१, फुले नगर-१, पखाल रोड-१, पेठ रोड (पंचवटी)-१, कथडा-१, सावरकर नगर-१, टिळकवाडी (आरटीओ)-१, पेठ रोड-१, उंटवाडी-१, चौक मंडई-१, राका कॉलनी-१, मखमलाबाद-१, ओम नगर-४, गंजमाळ-२, दत्त नगर-९, पेठ फाटा-१, जुने नाशिक-३, शालीमार-१, रत्नदीप हौसिंग (पंजाब कॉलनी)-१, संभाजी चौक-१, उत्तम नगर-१ अशा एकूण ३६ रुग्णांचा समावेश आहे.