नाशिक शहरात मंगळवारी (दि. १६ मार्च) पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. १६ मार्च) ९४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर शहरातील ५ जणांचा कोरोनामुळे मृयू झाला आहे. त्यामुळे आता: आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७३२, एकूण कोरोना रुग्ण:-८९,२८४, एकूण मृत्यू:-१०७१ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :-८०,९८३, उपचार घेत असलेले रुग्ण:-७२३० अशी संख्या झाली आहे.
कोरोनामुळे नाशिक शहरात मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) वडाळा,अशोका मार्ग येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष, २) पवन नगर,सिडको नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष, ३) उपनगर,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिला, ४) जुने सिडको आणि ५) नाशिक येथील ८२ वर्षीय वृद्ध पुरुष, पवन नगर, नाशिक येथील ६७वर्षीय वृद्ध पुरुष यांचा समावेश आहे.