नाशिक (प्रतिनिधी): शहरात मंगळवारी (दि. १६ जून २०२०) एकूण ७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा आजची आकडेवारी जास्त आहे. आज आढळून आलेली रुग्णसंख्या हा नवा उच्चांक आहे.
मंगळवारी दुपारी ३.१४ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: खोले मळा-१, पेठ रोड-१, जलालपूर (चांदसी)-१, नाशिकरोड-१, मखमलाबाद-१ अशा एकूण ५ रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी दुपारी ५.४५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: लाम रोड (देवळाली कॅम्प)-३, गामणे मळा (पाथर्डी फाटा)-४, रामनगर (पेठरोड पंचवटी)-४, वडाळा नका (रेणुका नगर)-१, पखाल रोड-३, पौर्णिमा बस स्टोप (नाशिक पुणे रोड)-२ अशा एकूण १७ रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी ६.५४ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: इंदिरानगर-१, गोरेराम लेन-१, बाजीप्रभू चौक (सिडको)-५, साईनाथ नगर-१, इतर-५, मेहेबुब नगर (वडाळा)-२, गोसावी नगर-२ अशा एकूण १७ रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी ७.१६ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पंचवटी-३, उत्तम नगर-१, दिंडोरी रोड-१, पाटील गल्ली (जुने नाशिक)-१, बाजीप्रभू चौक (सिडको)-१, नाईकवाडीपुरा-१, काठे गल्ली-१, रामाचे पिंपळस-३, बागवानपुरा-१, औरंगाबाद रोड-१, पेठरोड-१, शिवाजी नगर-१, पंचवटी-१, शालीमार-२, सिडको-१, भोई गल्ली-१, आरटीओ कॉर्नर-२, वैशाली नगर-१ अशा एकूण २४ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी ७.२५वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: अजमेरी मस्जिद-१, जुने नाशिक-५, रामवाडी-१, अशोका मार्ग-२, वडाळा रोड-१ अशा एकूण १० रुग्णांचा समावेश आहे.