नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात गुरुवारी (दि.१३ ऑगस्ट) तब्बल ३३४ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १३२३, एकूण कोरोना रुग्ण:-१५१४५ एकूण मृत्यू:-३८१ (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- ११,५८७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३१७७ अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) रायगड चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ, पवन नगर,नाशिक येथील ७७ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) आदर्श नगर, बोरगड येथील वर्षीय ६६वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) संत कबीर नगर, भोसला मिलिटरीच्या मागे नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) कामगार नगर, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) सातपूर नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) म्हसोबा नगर, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) नागझरी, कथडा, नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) निशांत गार्डन, धात्रक फाटा येथील ४८ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ९) सिद्धेश्वर नगर, हिरावाडी येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) सातपूर नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.