जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ६८२ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १६  हजार ३८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६४८  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २८५, चांदवड ५१, सिन्नर २०४, दिंडोरी ४८, निफाड २०९, देवळा ६५,  नांदगांव १०७, येवला १९, त्र्यंबकेश्वर १२, सुरगाणा १०, पेठ ००, कळवण ०४,  बागलाण ९३, इगतपुरी ३५, मालेगांव ग्रामीण १०२ असे एकूण  १२३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २३८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३२८  तर जिल्ह्याबाहेरील ०८  असे एकूण ४ हजार ८०९  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २१  हजार ८३९  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: गोणीत आढळलेल्या महिलेच्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली !

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.९५,  टक्के, नाशिक शहरात ७५.६३ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.८८  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.१५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.०१ इतके आहे

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १६३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३७१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९३ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादा भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ

(वरील आकडेवारी आज (दि. १३ ऑगस्ट) सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790