नाशिक शहरात शुक्रवारी (दि. 12 जून) 33 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; दोन जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १२ जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण ३३ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता शहरात एकूण कोरोना रुग्ण:-५४५, एकूण मृत्यू:- २९, घरी सोडलेले रुग्ण :- २१५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३०१ अशी संख्या झाली आहे.

दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालात आढळलेल्या रुग्णांमध्ये: पाथर्डी फाटा-२, आझाद चौक (जुने नाशिक)-२, मायको दवाखाना (गल्ली नं.९)- १, कमोद रोड (जुने नाशिक)-१, पंचवटी-५, कथडा -१, पेठ रोड (शनी मंदिर)-१, जाचक मळा (नाशिकरोड)-२, सुभाष रोड (नाशिकरोड)- ४, बिटको हॉस्पिटलजवळ-२, बागवानपुरा-३, महाराणा प्रताप नगर (पेठ रोड)-१, कालिका नगर (पेठ रोड)-१, सनराईज रेसिडेन्सी (हिरावाडी)-१, काठे गल्ली (द्वारका)-१, शिंगाडा तलाव-२, मायको हॉस्पिटल (दिंडोरी रोड)-१, बनकर चौक (द्वारका)-१, कोणार्क नगर-१

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार

यापैकी आढळून आलेल्या काही कोरोनाबाधीतांची हिस्ट्री:

रेणुका नगर वडाळा नाका  येथील ५९ वर्षीय वृद्धास श्वसनाचा व कफाचा त्रास होत असल्याने दिनांक ११ जून २०२० रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचे  दिनांक १२/०६/२०२० रोजी उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात निधन झाले.

वडाळा नाका, काळे चौक येथील ५६ वर्षीय वृद्ध महिला दि.२९ मे २०२०  रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचे दिनांक १२/०६/२०२० रोजी निधन झाले.

हे ही वाचा:  नाशिक: गोणीत आढळलेल्या महिलेच्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली !

सनराइज् रेसिडेन्सी,कमल नगर, हिरावाडी येथील ३९ वर्षीय पुरुषाच्या घश्याचे स्वाब पॉझिटिव्ह आलेले आहेत.

श्रीरंग बंगलो, बाजपेयी शाळेजवळ, काठे गल्ली ,द्वारका येथील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

रूम नंबर ५ व ६ ,अभिजीत अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड, गुरुद्वारा जवळ,शिंगाडा तलाव येथील एकाच कुटुंबातील ३६ वर्षीय महिला व २६ वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पैसे दिले नाहीत म्हणून आईलाच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

राज दत्तनगर, मायको हॉस्पिटल जवळ, दिंडोरी रोड येथील ३६ वर्षीय  महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

बनकर चौक, द्वारका नाशिक येथे ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

कोणार्क नगर,हरिओम रो हाऊस, नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790