नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर प्रेमसंबंध निर्माण करून तसेच तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ती ६ महिन्यांची गरोदर राहिली.
नाशिक जिल्ह्यातील कसोली (तालुका त्र्यंबकेश्वर) येथील संशयित कांतीलाल हरी गवळी याने एका अल्पवयीन मुलीसोबत आधी प्रेमसंबध निर्माण केले. या मुलीचं वय अवघं १५ वर्ष इतकं आहे. सदर मुलीचे कुटुंब हे पाथर्डी भागात सप्टेंबर २०२० दरम्यान कामानिमित्त आले होते. या दरम्यान सदर मुलगी आणि संशयीत आरोपी यांचे सुरुवातीला प्रेमसंबंध झाले. यादरम्यान शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यात सदर मुलगी ही सहा महिन्यांची गरोदर राहिली. यात सदर मुलीच्या बाळाची वाढ झाली नाही आणि त्याचा पोटातच मृत्यू झाला.
सदर संशयित आरोपीला हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथून अटक केली आहे. या संशयित आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२, कलम ४ आणि ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790