नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; शहरातील रस्ते जलमय

नाशिक | १३ मे २०२५ – मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात अवकाळी पावसाने जोर धरला असून, सोमवारी आणि मंगळवारी शहरातील विविध भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.

सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आणि मंगळवारी सायंकाळी पावणे तीनच्या दरम्यान नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याच्या झंझावातासह आलेल्या या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांनी ओसरी, दुकानांचे आडोसे अशा ठिकाणी आसरा घेतला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

शहरातील मेनरोड, शालिमार, गोदाघाट, सराफ बाजार, द्वारका सीबीएस, सिडको, नाशिकरोड, सातपूर या परिसरात पावसाचा विशेष तडाखा बसला. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. काही भागांत झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना देखील घडल्या.

👉 हे ही वाचा:  जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू - कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीचदरम्यान ५.६ मिमी, तर अडीच ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान १५.४ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण दिवसभरात २१ मिमी पाऊस पडला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: चहा विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक !

दरम्यान, वातावरणात सातत्याने बदल होत असून, कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या अनपेक्षित हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे, त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790