सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया…
नाशिक। ०४ जून २०२५: नाशिक : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते.
दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
तर यावर बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पक्षात नाराजी व्यक्त करणे, हा काही गुन्हा नाही. मात्र या संदर्भात माझाशी कुठलीही चर्चा झाली नाही. मी सध्या नाशिकच्या बाहेर आहे. त्यामुळे मी पक्षाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहू शकलो नाही. माझा नियोजित दौरा असल्याचे मी कळवले ही होतं. परंतु पक्षावर नाराजी व्यक्त कारणं किंवा मुख्यमंत्र्याना भेटल्यावरून जर अशी कारवाई होत असेल तर मला वाटतं हे चुकीची आहे.”
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790