नाशिक: शहरातील २ लाख १२६ बालकांसाठी रविवारी पोलिओ लसीकरण

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्याच्या आरोग्य विभागाकडून रविवारी (दि. ३)ला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शहरातील ५ वर्षांच्या आतील २ लाख १२६ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. राजीव गांधी भवनात सोमवारी (दि. २६) आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

मोहिमेसाठी शहरात ८७६ पोलिओ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत. याशिवाय ६५ ट्रान्झिट टीम तसेच ४२ मोबाइल टीम असणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले, ३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाचदरम्यान ही मोहीम राबविली जाईल. जी बालके पोलिओ डोसपासून वंचित राहतील त्यांना ४ ते ८ मार्चदरम्यान आयपीपर्पाआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम, नाइट टीमद्वारे डोस दिला जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790