नाशिकला सलग दुसऱ्या दिवशीही रोड-रोमिओंना पोलिसांचा दणका

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील शाळा-महाविद्यालयाजवळ टपोरीपणाला साजेसा धुडघूस घालणाऱ्या रोडरोमियोंसह सिगारेटचे झुरके उडवित टवाळखोरी करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी मंगळवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात २२२ टवाळखोर आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या १०३ अशा ३२५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

अनेक शाळा-महाविद्यालये तसेच याठिकाणी विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काही रोडरोमिओंचीही गर्दी असते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढली केली जाते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये मंगळवारी (ता. १) सकाळपासून मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार व पथकाने रोडरोमिओंना पोलीसी हिसका दाखविला.

या विशेष मोहिमेदरम्यान बुधवारी (ता. २) १५७ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच, शाळा-महाविद्यालय परिसरापासून शंभर मीटर अंतरात असलेल्या पानटपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सिगारेट आढळून आल्याने अशा टपरी चालकांविरोधातही कारवाई झाली.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या विवाहितेचा जादूटोण्याच्या नावाखाली सासरी छळ; पतीसह सासू-नणंदविरुद्ध गुन्हा दाखल

तसेच, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या ६६ जणांवर कोटपा कायद्यान्वये कारवाया करण्यात आल्या. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पीसीबी-एमओबीकडील पथकाने एकूण २२३ कारवाया केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाईमुळे रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहेत. नाशिक शहर पोलिसांच्या या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे ही कारवाई अशीच पुढे चालू ठेवावी अशी मागणीही नागरिक करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790