नाशिक: ‘स्पा’च्या नावाखाली सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांचा छापा !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी रोडवरील कर्मा क्रिस्टल संकुलात सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री सुरू असलेला अड्डा उदध्वस्त केला आहे. इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला व चौघांना अटक केली आहे. तर, एक संशयित पसार आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात पुन्हा स्पा सेंटरच्या आडून देहविक्रीच्या व्यवसायाने जोर धरला असून त्याविरोधात धडक कारवाईची मागणी होते आहे.

आयेशा आजिम कादरी (३८, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा), विजयकुमार नायर (४३, रा. आर्केट अपार्टमेंट, दामोदरनगर, नाशिक), सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी (३४, रा. काझी मंजिल, सुखदेवनगर, पाथर्डी गाव), अजय बबलू चव्हाण (३३, रा. वेदांत पार्क, दामोदरनगर), रवी कोंडाजी मुठाळ (२७, रा. लहवित बाजगीरा फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, मुख्य संशयित शुभम चव्हाण हा पसार आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

पोलिस अंमलदार सागर परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, पाथर्डी रोडवरील कर्मा क्रिस्टल या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्पा सेंटरमध्ये अनैतिकरित्या देहविक्रीचा व्यवसाय चालतो, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी बनावट गिर्हाईक या स्पा सेंटरमध्ये पाठविले.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

बनावट गिऱ्हाइकाने इशारा देताच दबा धरून असलेल्या पोलिस पथकाने स्पा सेंटरवर धाड टाकली. त्यावेळी त्याठिकाणी संशयित आयेशा कादरी हिच्यासह चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. स्पा सेंटरमध्ये दोन पीडित महिला आढळून आल्या. याठिकाणी पार्टीशन टाकून दोन खोल्या करण्यात आल्या होत्या. याठिकाणी कंडोमची पाकिटे सापडली आहेत.

पीडित महिलांना मसाजच्या कामासाठी आणून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री केली जात असल्याचे पीडित महिलांनी सांगितले. पीडित दोघींची सुटका करीत त्यांना महिलाच्या वात्सल्य आश्रमात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे, सहायक निरीक्षक निखिल बोंडे, संदीप पवार, महिला उपनिरीक्षक बारेला, जावेद खान, मुशरीफ शेख, चंद्रभान पाटील, धनवंता राऊत, सोनवणे यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली.

”स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, त्यावर निश्चितपणे पोलिसांकडून कारवाई केली जाईल.”- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790