नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत आराखड्यांतर्गत ‘पोलिस आयुक्त आपल्या दारी’ हा उपक्रम बुधवारी (दि. २२) शहरात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील विविध भागात पोलिस आयुक्तांसह उपआयुक्त, सहायक आयुक्त सकाळी ११ वाजता नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत. नागरिकांना या उपक्रमात आपल्या तक्रारी पोलिस अधिकाऱ्यांकडे मांडण्याची संधी मिळणार आहे.
या ठिकाणी बुधवारी सकाळी ११ वाजता उपक्रम:
👉 रामकुंड पोलिस चौकी: आयुक्त संदीप कर्णिक
👉 पाटीलनगर गार्डन, अंबड पोलिस ठाणे: उपायुक्त प्रशांत बच्छाव
👉 दुध बाजार पोलिस चौकी: उपायुक्त किरणकुमार चव्हाण
👉 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ना. रोड: उपायुक्त मोनिका राऊत
👉 सातपूर गाव पोलिस चौकी: उपायुक्त चंद्रकांत खांडवी
👉 मारुती मंदिर, आडगाव: सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे
👉 कुलकर्णी गार्डन: सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव
👉 आनंदनगर पोलिस चौकी, इंदिरानगर: सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख
👉 शाळा क्र. १२५, जॉगिंग ट्रॅक, उपनगर: सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी
👉 म्हसरूळ गाव पोलिस चौकी: सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके
👉 शिवाजीनगर पोलिस चौकी, गंगापूर: सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम
👉 अशोका मार्ग पोलिस चौकी: सहायक पोलीस आयुक्त सुधाकर सुरवाडकर
👉 भगूर पोलिस चौकी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण
👉 भोर टाऊनशिप, जाधव कॉम्प्लेक्स, चुंचाळे: वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख.