नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 ऑक्टोबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२५ (जिल्हा माहिती कार्यालय): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 16 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 30 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790