
नाशिक। दि. १२ ऑगस्ट २०२५: पोलीस आयुक्तालय नाशिक शहर आस्थापनेवर नेमणुकीस असलेलया पाच पोलीस निरीक्षकांची सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली आहे.
यात दिवाणसिंग वसावे (नेमणूक: शहर वाहतुक शाखा नाशिक शहर युनिट-२), दिनकर कदम (नेमणूक: शहर वाहतुक शाखा युनिट-२) सुभाष भोये (नेमणूक: नियंत्रण कक्ष नाशिक शहर), इरफान शेख, (नेमणूक: आर्थिक गुन्हेशाखा) आणि श्रीमती नम्रता देसाई (नेमणूक: नियंत्रण कक्ष, नाशिक शहर) यांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांनी पोलीस दलात महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली असुन, त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था उत्कृष्टपणे हाताळणे, नागरीकांशी चांगल्या प्रकारे संवाद, प्रशासकिय कामकाज तसेच वरिष्ठांनी दिलेले कामकाज चांगल्या प्रकारे हाताळुन कार्यकुशलता व प्रामाणिक सेवा या उल्लेखनिय कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र शासनाने त्यांची सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती दिलेली आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झालेले पोलीस निरीक्षक यांचे पोलीस आयुक्त, कार्यालय नाशिक शहर येथे पुष्पगुच्छ देवुन सत्कार करून नविन जबाबदारीसाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.