नाशिक: १४ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना मिळाला परत !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळ पोलिस ठाण्याची हद्द भौगोलिकदृष्ट्या मोठी असून, नव्याने उदयास येणाऱ्या विविध कॉलन्या, वसाहतींचा या हद्दीत समावेश होतो. वाढते शहरीकरणामुळे या भागात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान म्हसरूळ पोलिसांपुढे असते. विविध गुन्ह्यांचा छडा लावून जप्त केलेला सुमारे १४ लाख २२ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल बुधवारी (दि. १०) मूळ फिर्यादी मालकांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

म्हसरूळ पोलिस ठाण्यात मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी व्यासपीठावर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले, “नाशिककर नेहमीच पोलिस दलाला चांगले सहकार्य करतात. यापुढे असेच सहकार्य अपेक्षित असून, नागरिकांच्या सहकार्याशिवाय व लोकसहभागाशिवाय कायदा व सुव्यवस्था राखणे अशक्य आहे. कुठल्याही प्रकारची असुरक्षितता सार्वजनिक ठिकाणी जाणवत असल्यास पोलिसांच्या सीपी व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर एक मॅसेज पाठवून सूचना करावी, त्याची अंमलबजावणी केली जाईल.”

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

तसेच आपत्कालीन पोलिस मदतीसाठी ११२ डायल करावा, असे आवाहन त्यांनी केले. ४ लाख ९ हजार रुपये किमतीचे दागिने, ४ लाख १९ हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी, १ लाख १ हजार रुपयांचे ५ मोबाइल व ४ लाख रुपये किमतीच्या मोटारी असा सुमारे १४ लाख २२ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना वाटप करण्यात आला. तसेच चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळावा यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला अंमलदार उज्ज्वला शिंदे, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, वाल्मीकी खैरनार आदी कर्मचाऱ्यांचा कर्णिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी आभार मानले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790