🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणीत ८४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई !

नाशिक। दि. २ जानेवारी २०२६: शहर पोलिसांनी ‘थर्टि फर्स्ट’ला मद्यसेवन करून कोणीही वाहन चालवू नये, असे आवाहन केले होते, तरीही ८४ वाहनचालकांनी मद्यप्राशन करत रस्त्यांवरून वाहने दामटविली. शहर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ‘ब्रेथ अॅनालायझर’द्वारे त्यांची खात्री पटवून थंडीच्या कडाक्यात ‘नशा’ उतरविली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध वाहतूक मार्गात बदल

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर मद्यधुंद अवस्थेत शहरातील रस्त्यांवरून कोणीही वाहने दामटवून धिंगाणा घालून रस्ता सुरक्षा धोक्यात आणू नये, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून सर्व प्रमुख रस्त्यांवर ‘नाकाबंदी पॉइंट’ निश्चित करण्यात आले होते. याठिकाणी संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती. अमली पदार्थविरोधी पथक, गुंडविरोधी पथक, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, विशेष शाखांचे अधिकारी यांची बैठक घेत हुल्लडबाजांवर कारवाईचे आदेश दिले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790