नाशिक: ‘त्या’ युवकाच्या खुनाचा पोलिसांनी केला २४ तासांत उलगडा; ४ अटकेत !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळ पोलीस हद्दीतील खूनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये उघडकीस आणला असून चार आरोपींना गजाआड केले आहे. रामवाडी येथील रिक्षाचालक प्रशांत तोडकर याची अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून दगडाने ठेचून हत्या केली होती.

त्यानंतर गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपांना पिंपरी चिंचवड येछे असल्याचे समजले. त्यानंतर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी पिंपरी चिंचवडला असल्याचे कळाल्यानंतर नाशिकच्या पथकाने आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हेशाखा युनिट क २ चे मदतीने शोध घेऊन थरमॅक्स चौक, निगडी पुणे येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. य़ा प्रकरणात विजय दत्तात्रय आहेर (वय-३०वर्षे, रा-रामवाडी पंचवटी नाशिक), संकेत प्रदिप गोसावी (वय-२६वर्षे, रा-जुईनगर म्हसरूळ पंचवटी नाशिक), प्रशांत निंबा हादगे (वय-२९वर्षे, रा- पेठरोड मेहरधाम, पंचवटी नाशिक), कुणाल कैलास पन्हाळे (वय-३०वर्षे, रा-मायको दवाखान्याच्या पाठीमागे दिंडोरीरोड पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेतले.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

त्यांची चौकशी केल्यानंतर विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्या काही दिवसापूर्वी शाब्दीक वाद झाला होता. १५ जून रोजी शाब्दीक वादाचे रूपांतर भांडणात झाले. प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालुन खून केला असल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा), संदिप मिटके (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक), यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, नाझिमखान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे पोना प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोअ विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, चासपोउनि किरण शिरसाठ यांनी केलेली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here