नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर परिसरात जॉगिंग ट्रॅक, मोकळी पटांगणे, गार्डन, उद्याने, पडीक वसाहती आदी निर्जन स्थळांवर बसलेले मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ६ ते रात्री ८ या दोन तासांत परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३७८ टवाळखोरांची धरपकड करण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.
पथकांनी अचानकपणे परिमंडळ १ मधील पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, सरकारवाडा, मुंबईनाका, भद्रकाली या पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६६ आणि परिमंडळ २ मधील सातपूर, अंबड, चुंचाळे चौकी, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१२ गुन्हे शाखा, अमली विरोधी पथक, दरोडा व शस्त्र विरोधी पथक आणि पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ३७८ टवाळखोरांवर कारवाई केली. नाकेबंदीमध्ये आठ वाहनांवर कारवाई करण्यात आली.