नाशिक: म्हसरुळला कारमधून विदेशी मद्यसाठा जप्त; पोलिसांची धडक कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैधरीत्या देशी-विदेशी मद्याची तस्करी वाढल्याने शहर गुन्हे शाखेचे पथकेही सतर्क झाले आहेत. त्यामुळे म्हसरुळ हद्दीमध्ये विदेशी मद्याची तस्करी करताना फोक्स-वॅगन कारसह मद्यसाठा असा सुमारे २ लाख ८६ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच, आयुक्तालय हद्दीतूनही ठिकठिकाणी छापेमारी करीत अवैध धंद्यांचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध धंदे, मद्यविक्री, शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या पथकांनी चांगलाच फास आवळला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी हत्यारे बाळगणारे, अवैध देशीदारुचे अड्ड्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

शहर गुन्हे शाखेच्या विशेष शाखेचे अंमलदार भारत डंबाळे यांच्या फिर्यादीनुसार, पेठ रोडवरील म्हसरुळ हद्दीमध्ये अवैधरीत्या मद्याची तस्करी होत असल्याची खबर अंमलदार गणेश वडजे यांना मिळाली होती. ही माहिती विशेष पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार, पेठ रोडवरील सप्तरंग सोसायटीसमोरील हिरा-घुंगरू बारसमोर पथकाने सापळा रचला.

कार (एमएच १९ बीजे ६९१०) मध्ये विदेशी मद्याचा साठा केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पथकाने संशयित गौरव प्रकाश चव्हाण (३८, रा. बुधवार पेठ, जुने नाशिक) यास अटक केली. संशयित चव्हाण हा हॉटेल चालक असून त्याने अवैधरीत्या विदेशी मद्य व बिअरचा साठा करून विक्रीचा प्रयत्न केला. संशयित चव्हाण याच्याकडे मद्यविक्रीचा परवाना नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

याप्रकरणी विशेष पथकाने कारसह मद्यसाठा असा २ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा ऐवज जपत केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे व सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार किशोर रोकडे, भारत डंबाळे, रवींद्र दिघे, बाळासाहेब नांद्रे यांनी बजावली.

पंचवटी, अंबड, नाशिक रोडला कारवाई:
अवैधरीत्या मद्यविक्री प्रकरणी अंबड, पंचवटी व नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली आहे. पंचवटीतील फुले नगरच्या म्हाडा वसाहतीत संशयित उमेश सुनील साबळे (२६, रा. कालिका नगर, फुले नगर) यास २ हजार ९० रुपयांची देशी दारूची विक्री करताना अटक केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

तर, अंबड हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारील पत्र्याचे शेडमध्ये संशयित विशाल राजेंद्र पाटील (३३, रा. कार्बन नाका, शिवाजीनगर, सातपूर) यास १८९० रुपयांच्या देशी दारू समवेत अटक केली आहे. तर नाशिक रोडच्या शिंदे गावात अमरधाम रोडवरील मोकळ्या जागेत संशयित सचिन मारुती गव्हाणे (४३, रा. शिंदे गाव) याच्याकडून १७०० रुपयांची देशी दारू जप्त केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here