नाशिक: म्हसरूळला सहा लाखांचा गुटखा जप्त; म्हसरूळ पोलिसांची कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरीरोडवरील कलानगर येथील गुरुमाऊली बंगला येथे पोलिसांनी छापा टाकून ६ लाख ६० हजार ६० रुपयाचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा म्हणजेच गुटखा जप्त केला. हा साठा अवैधपणे साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. पोलीस आल्याची चाहुल लागताच संशयित भास्कर गरड हा पळून गेला.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या विवाहितेचा जादूटोण्याच्या नावाखाली सासरी छळ; पतीसह सासू-नणंदविरुद्ध गुन्हा दाखल

या बंगल्याची पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्यात वेगवेगळया रंगाचे प्लॅस्टीक गोण्या व खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले. त्यांची पहाणी करता त्यात विमल पान मसाला, मिराज किर, काकील टोबॅको, वाह पानमसाला, व्ही-१ टोबॅको, डब्ल्यु चॅव्यींग टोबॅको असे प्रतिबंधीत असलेला एकुण ६,६०,०६० रुपये किंमतीचा पानमसाला व तंबाखू मिळून आला. या छाप्यानंतर भास्कर गरड याचे विरूध्द पोहवा देवराम चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

या तक्रारीवरुन म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरचा माल कोठून आणला व त्याची विक्री कोठे होणार होती याबाबत तपास चालु आहे. सदरचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नितिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि सुभाष ढवळे, पोउपनि डी. वाय. पटारे, पोउपनि यु.एम. हाके, पोहवा देवराम चव्हाण, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, पोलीस अंमलदार पंकज चव्हाण, पंकज महाले, गिरिधर भुसारे, जितु शिंदे यांनी केलेली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790