

नाशिक (प्रतिनिधी): सायबर फसवणूक टाळण्यासाठी सायबर दूत ही संकल्पना सुरू करण्यात आली असून, आजपावेतो १०१४ सायबर दूत प्रशिक्षित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

नाशिक शहरात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांसाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सायबर दूत ही संकल्पना पुढे आली. यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गुरुवारी सायबर गुन्हे जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेला गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे व सायबर गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक शेख यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, की सायबर गुन्हे करणे म्हणजे एक प्रकारची फसवणूकच आहे आणि फसवणूक करणार्या या व्यक्तींची एक टोळीच असते. ती वेगवेगळी आमिष दाखवून जाळ्यात ओढतात आणि फसवणूक करतात यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील महाविद्यालये, सोसायट्या, तसेच युवक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायबर दूत ही संकल्पना राबविण्यात येत आहे, असे सांगून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, की यापूर्वी दि. 1 मे रोजी अशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन करण्यात आले होते. आज गुरुवारी 489 विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित आहेत.
समाजात या सायबर दूतच्या माध्यमातून जनजागृती करून बदलत्या युगामध्ये बदलत्या तंत्रज्ञानाने नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना या वाढू लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून, जर अशा घटनांमुळे सामाजिक घटना या घडू शकतात. त्या रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी यांनी केले.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790