नाशिक। दि. ३१ जुलै २०२५: बाबाज थिएटर्स आयोजित जेष्ठ नागरिक आणि सुजाण संगीत प्रेमींसाठी दर महिन्याच्या 1 तारखेला “संगीत मैफिल आणि कृतज्ञता सन्मान पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मासिक पुष्पाचे 57 वे पुष्प रसिकांसाठी विनामूल्य सादर करण्यात येत आहे. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड नाशिक येथे शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता रसिकांसाठी विनामूल्य असणारा हा कार्यक्रम सादर होणार आहे.
प्रशांत जुन्नरे यांची संकल्पना असलेला लक्ष्मीकांत भालचंद्र रत्नपारखी प्रस्तुत गझल प्रेमींसाठी “श्याम ए गझल” हा विशेष कार्यक्रम सुप्रसिद्ध गजल गायक सुभाष जीवनगीकर आणि गायिका सौ.शितल रत्नपारखी हे त्यांच्या गायनातून सादर करतील. संगीत संयोजन अमोल पाळेकर यांचे असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक शरद जांभेकर, प्रसाद गोखले, जितेंद्र सोनवणे, सुशील केदारे हे साथ संगत करणार आहेत. पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा फासे करतील.
तसेच या कार्यक्रमांतर्गत नाशिक च्या सांस्कृतिक ,सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन मान्यवरांचा “कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे (मराठा विद्या प्रसारक नाशिक) आणि माझी अध्यक्ष नाशिक सिविलियन फोरम: सुनील भायभंग हे उपस्थित राहणार आहेत. नाशिकचा हा मानाचा पुरस्कार प्रमुख अतिथी आणि बाबाज थिएटर्सच्या आयोजकांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येईल.
या वेळचे पुरस्कारार्थी: दीपक कृष्णराव पाटील (क्रीडा) अध्यक्ष यशवंत व्यायाम शाळा, अंशु सिंग( कला आणि सांस्कृतिक) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभिनेते, नितीन सुगंधी कापसे (सामाजिक) हे आहेत.
तरी या विशेष कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाबाज थिएटर्सचे आयोजक कैलास पाटील, शामराव केदार, प्रीतम पावशे, प्रा. डॉ. प्रीतिश कुलकर्णी ,जे पी जाधव ,दिलीप सिंह पाटील ,सौ योगिता पाटील, एन सी देशपांडे, राजा पाटेकर, मिलिंद जोशी, शिल्पा फासे यांची केले आहे.
![]()

