नाशिक: सेफ्टी टँकमध्ये पडून ४ वर्षीय मुलीचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): बंगल्याच्या बांधकाम प्रकल्पावरील सेफ्टी टँकमध्ये पडल्याने चार वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चांदगिरी गाव येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रागिणी महेंद्रकुमार वर्मा (४) असे या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

चांदगिरी गावात एका बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. येथे मजुराची मुलगी खेळत असताना सेफ्टी टँकमध्ये पडली. काही वेळाने तिचे वडील महेंद्रकुमार वर्मा यांच्या हा प्रकार लक्षात आला. पाण्याच्या बाहेर काढून बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790