नाशिक: सर्पदंशाच्या गंभीर रुग्णाला ‘अपोलो’मध्ये मिळाले जीवदान !

अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्याला मेंदू विकार तज्ञ डॉ. जितेंद्र शुक्ल यांनी रुग्णाच्या काही तपासण्या केल्या त्यामध्ये त्याला Neuroparalytic Snake Bite म्हणजे विषारी साप चावल्याने त्याच्या मज्जातंतून वर विषाचा परिणाम झाल्याने तो बेशुद्ध होऊन त्याच्या दोन्ही हातपायांची हालचाल पूर्णपणे थांबली होती आणि त्याला श्वासही घेता येत नव्हता.. तो कोमात गेला होता त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याची EEG ही मेंदूची तपासणी केली असता असे लक्षात आले की त्याच्या मेंदूचे कार्य व्यवस्थित सुरू आहे पण तो श्वास घेऊ शकत नाही आणि  हालचाल पण काहीच नाही परंतु डॉक्टरांनी यावर प्रभावी उपचार सुरू ठेवले, दोन दिवसांनी संग्रामच्या हातापायाची हालचाल थोडी थोडी सुरू झाली आणि तो हळू हळू  शुद्धीवर आला तो आठ दिवस व्हेंटिलेटर वर होता.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

यावेळी मेंदू विकार तज्ञ डॉ. जितेंद्र शुक्ल म्हणाले सर्पदंश झाल्या झाल्या लगेच रुग्णालयात आल्याने वेळेवर निदान आणि उपचार सुरू झाल्याने संग्रामच्या  जीव वाचला, सर्पदंश जरी झाला तरी वेळीच उपचार मिळाल्याने केले तर रुग्णाचा जीव वाचतो , बऱ्याच वेळी अशा रुग्णांचे निदान न झाल्याने आणि असे रुग्ण कोमात असल्याने त्यांच्यावर आक्रमक उपचार केले जात नाही पण वेळीच तपासण्या करून उपचार केल्याने रुग्णाचा जीव वाचू शकतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले की, अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये सर्पदंशावरती आवश्यक असणारी लस आणि उपचार 24 तास उपलब्ध आहे. सुसज्ज अतिदक्षता विभाग, अनुभवी तज्ञ डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यामुळे अशा गंभीर रुग्णांवर उपचार करून त्यांचा जीव वाचवणे शक्य होते.  हे सगळं टीम वर्क असल्याने यामध्ये मेंदू विकार तज्ञ डॉ.जितेंद्र शुक्ल, डॉ.प्रवीण ताजने,डॉ.अतुल सांगळे, डॉ.अमोल खोलमकर यांनी अथक परिश्रम घेतले रुग्णाला वेळेवर प्रभावी उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. या सर्वांचे मी कौतुक करतो.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790