नाशिक सिटीझन्स फोरमतर्फे आज (दि. २६) संवादसत्र

नाशिक (प्रतिनिधी): जगातल्या पहिल्या दहापैकी एक आणि देशातले सर्वात मोठे असे वाढवण बंदर नाशिकपासून अवघ्या पावणेदोनशे किमी 6अंतरावर साकारले जात आहे. तब्बल ७५ हजार कोटी गुंतवणूक असलेले हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा प्रभाव नाशिकच्या अर्थ-उद्योगावरही पडणार आहे.

या महात्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिकला अनेक नव्या औद्योगिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. त्या कशा? याविषयी या प्रकल्पाच्या उभारणीची धुरा ज्यांच्याकडे आहे आहे त्या उन्मेष शरद वाघ (IRS चेअरमन-जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि सीएमडी-वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लि.) यांच्याशी उद्या नाशिकमधील उद्योग प्रतिनिधींच्या संवादसत्राचे आयोजन नाशिक सिटीझन्स फोरम आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे.

  • गुरुवार दि. २६ डिसेंबर २४ रोजी, दु. ४ वाजता.
  • सेमिनार हॉल, मविप्र केबीटी इंजिनिअरींग कॉलेज सेमिनार हॉल

Loading

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट; मुंबई, पुणे नाशिकची परिस्थिती कशी असेल.. वाचा सविस्तर…

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790